लेखक परिचयलेखक परिचय

v संपूर्ण नाव      : श्री सुनिल बबनराव कनले

v भ्रमरध्वनी     : 9767376246 / 8999956161
v पत्ता                : ‘श्री विश्वात्मा निवास’
                       मु.सोन्ना पो. मांडाखळी ता.जि.परभणी - 431537
                       (महाराष्ट्र- भारत )
v ईमेल              : sunilkanle@gmail.com
v संकेतस्थळ     : www.sunilkanle.com
v शिक्षण          : एम.ए. मराठी
v व्यवसाय         : शासकिय नौकरी (ग्रामसेवक)
v कार्यालय         : पंचायत समिती, तूळजापूर जि.उस्मानाबाद
v ईतर गुणवत्ता    : व्याख्याता, लेखक, मार्गदर्शक

v ईतर माहिती :
              श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे.
            लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.
श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु