परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा (फोटो) विषयी असलेले निरर्थक गैरसमज...!


swamincya pratime vishayi asalele gairsamaj
अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैसमज व त्यावर खुलासा....!
1) स्वामींची प्रतिमा (फोटो) फक्त राजयोगात असणारा पाहिजे, हातात ब्रह्मांड (गोटी) असलेला नको,
2)स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको,
3) स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको,
4) स्वामीं महाराज उभे असलेली प्रतिमा नको.
हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का?

तर मुळीच नाही! वरील सर्व गैरसमज धाधान्त खोटे व निर्रथक आहेत, कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे, जे स्वामी अक्कलकोट मध्ये 22 वर्ष केवळ वटवृक्षाखाली बसले त्यांचा तो फोटो ठेवायला मज्जाव करणे, आपल्या धर्मात जिला गोमाता मानून तिची पूजा मांगल्य निर्माण करते असे म्हणतात,, जिच्यात 33 कोटि देवता विराजमान आहेत. जिचे मूत्र आणि विष्ठा हि पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. अन सर्वात महत्वपूर्ण म्हणजे ज्या स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव्यकाळात ज्या भागीरथी गायीला क्षणभर ही अंतरू दिले नाही, तिच्या मृत्युनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करुण समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फ़ोटो ठेवायला मनाई करणे, जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत. त्यांचाच उभा असलेला फ़ोटो न पूजने किंवा वरील प्रकारच्या प्रतिमा न पूजने हा त्यांच्या परब्रह्म तत्वाचा अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्या पेक्षाही ही मोठा आहे.
स्वामींच्या लीलाकाळात बाळापा पासून ते आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील ब्रह्मांड हातात घेतलेलाच फोटो पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत. त्यांचे कल्याण करुण त्यांना मोक्ष देणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे अहित करतील असा विचार मनात आनने ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल आणि आपली दुर्दशा ठरेल. तेव्हा अशा बाबी टाळून स्वामींची सेवा करुण आपले कल्याण करुण घ्यावे, ही नम्र विनंती.....!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
II श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु II