नृंसिह सरस्वती स्वामींनी संसाराबद्दल दिलेला महत्वपुर्ण संदेश


नृंसिह सरस्वती स्वामींनी संसाराबद्दल दिलेला महत्वपुर्ण संदेश


संसार हा वाटतो तितका टाकाऊ नाही, उलट क्रमविकासाच्या दृष्टिने तो आवश्यक असून षड्विकारावर मात करण्याच्य दृष्टिने संसार म्हणजे प्रयोगशाळाच आहे. या प्रयोगशाळेत राहून एकेक विकार जिंकित जिंकित तो ज्या वेळी षडविकारावर विजय मिळतो,
त्याच वेळी त्याचा मनोमय कोश हा पुढिल विकासाच्या दृष्टिने उत्क्रांत होतो. म्हणून विकार जिंकावयाचे असतील तर ते जिथे संभवतील अशा संसारात राहूनच समोरासमोर त्यांच्याशी मुकाबला करणे हेच योग्य. विकार जिंकणे हे विकार टाळण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. म्हणून संसार हा सारशुन्य मानु नये. त्यात असणारे सार हे दुसरे कशातच नाही. परमार्थाच्या गुरूकुलात प्रवेश करण्यापुर्वी संसाराची कसोटी उतीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणून संसार हा कधी टाकायचा नसतो. मनातून अनासक्तीचा सुगंध सुटू लागला की, हा स्वयमेव सुटला, तरच सुटतो. तो टाकून कधीही  टाकला जात नाही. ज्या प्रवृत्तीमुळे संसार केला जातो, तीच प्रवृत्ती नाहीसी झाली की, संसार करूनही केल्यासारखेच आहे. संसार स्वरूपत: वाईट नाही. त्याचा बरे वाईटपणा हा आपल्या मानसिक अधिष्ठानात आहे.
( हा संदेश नृसिंह सरस्वती स्वामींनी आपली बहिण रत्नाई हिने वैराग्य घेण्याची ईच्छा प्रकट केल्यानंतर तिची समजूत घालून तिला केला होता.)


                        नृसिंह सरस्वती स्वामींचा शेवटचा संदेश
औट घटकेचा लाभलेल्या अत्यल्प आयुष्यातही ईश्वरभक्तीची मंगल प्रभा फाकेल  आणि ईश्वरकृपेने जीवनाचे सोने होईल. अशी  वागणूक असावी. देहाच्या उखळात मनाच्या मुसळाने विवेकाचे तांदूळ कांडले असता हळुळु विवेक दितीने चित्त शुध्द होते. हे लक्षात ठेवा आणि कुणालाही शरीराने, मनाने आणि वाणीने दुखवू नका.


-   श्री. सुनिल कनले

प्रज्ञापूरचे अक्कलकोट बनवणाऱ्या स्वामींचा सेवक !
अर्थात  बुध्दीचा अंहकार नष्ट करून ईश भक्तीची  ज्योत पेटवणाऱ्या
अक्कलकोटच्या  श्री  स्वामी  समर्थ महाराजांचा सेवकरी !