भिऊ नकोस... दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न।। श्री स्वामी समर्थ ।।
।।श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ।।

भिऊ नकोस... दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न


अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
सर्व स्वामी भक्तांना कळविन्यास हर्ष होतो की, परब्रह्म भगवान श्री स्वामी देवांच्या कृपार्शिवादाने आज 'भिऊ नकोस' या प्रथम दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
हा दीपावली अंक म्हणजे श्री स्वामी देवांच्या अलौकिक शक्तिचा दाखला आहे, कारण स्वामी महाराजांच्याच प्रेरणेने केवळ 05 दिवसांत हा अंक संकल्पनेपासून ते ई-बुक साकार झालेला आहे. हा साहित्य क्षेत्रातील एक चमत्कारच म्हणावा लागेल. असा हा आगळा वेगळा विशेषांक आहे.
या दिवाळी अंकात अध्यात्म विषयक लेख, नामाचे महत्व, स्वामी महाराजांची माहिती देणारे लेख, स्वामी वैभव दर्शन भाग एक मधील 'अक्कलकोट माहात्म्य', स्वामी महाराजांच्या सेवेची माहिती, आध्यात्मिक शंका समाधान, रामयणाचे महत्व, श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा दिव्य संदेश इ. महत्वपूर्ण वाचनीय लेख आहेत. तरी सर्व स्वामी भक्तांनी या दिवाळी अंकाचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच इतरांपर्यंत ही हा अंक पोहोचवावा. हा अंक पीडीएफ स्वरुपात (ई-बुक) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
तसेच आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. ही विनंती.
अंक मिळवण्यासाठी संपर्क  :-
स्वामीदास श्री सुनिल कनले
संपर्क : - ०८९९९९५६१६१
व्हाट्सएप नंबर :- ०९७६७३७६२४६
श्री वटवृक्ष स्वामी प्रकाशन
सोन्ना ता. जि. परभणी - ४३१४०२ 


https://drive.google.com/open?id=12SyWvwqnzElnOPzaGlM25sNpTcJKzamn

श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०२


।। श्री स्वामी समर्थ ।।
।। श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ।।

।। श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०२।।
।। स्वामीसुताची सत्यवाणी ।।
 ई-बुक प्रकाशित....!

सर्व स्वामी भक्तांना 'आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या' लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा...!
पूर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिर्वादाने आज 'श्री स्वामीसुताची सत्यवाणी' या श्री स्वामीसुत महाराजांच्या अभंगावरील अर्थपूर्ण निरूपण केलेले ई-बुक आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहोत. यात आपल्याला स्वामीसुताची भक्ति, निष्ठा आणि श्रद्धा यांचा अपूर्व संगम पहावयास मिळतो. आपल्यातील सेवा, श्रद्धाभाव आणि ईश्वरावरील भक्ती वाढविन्यासाठी प्रत्येकानी आवर्जून वाचावे, असे हे ई-बुक आहे.
           तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि इतरांनासुध्दा हे अवश्य पाठवावे.  हिच सर्व स्वामीभक्तांना विन्रम प्रार्थना....!

विनामूल्य ई-बुकसाठी संपर्क :-
स्वामीदास श्री सुनिल कनले
संपर्क :- ०९७६६३७६२४६
            ०८९९९९५६१६१
श्री वटवृक्ष स्वामी करीता

ई-बुक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...!

श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक।। श्री स्वामी समर्थ ।।
।। श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ।।
।। श्री स्वामी चरित्र पारायण समूह भक्त मंडळ ।।
देवाधिदेव श्री स्वामी देवांच्या कृपाशिर्वादाने आणि स्वामी भक्तांच्या आग्रहास्तव सर्व स्वामी भक्तांना अधिक मासानिमित्त एक अप्रतिम भेट.....!
श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक
         बऱ्याच दिवासाच्या प्रतिक्षेनंतर श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक हे आज अधिक जेष्ठ शुक्ल पक्ष १०, शके १९४० वार- गुरुवार दि.२४/०५/२०१८ रोजी प्रकाशित केले आहे!
          या ई-बुक मध्ये श्री विष्णु बळवंत थोरात लिखित २१ अध्यायी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी, श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर विरचित अत्यंत प्रभावी श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामीचरित्र स्तोत्र, श्री स्वामीपाठ आणि श्री विश्वनाथ वऱ्हांडपांडे विरचित श्री तारक मंत्र याचा समावेश आहे !

परब्रह्म स्वामी महाराजांची साधना कशी करावी ?॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 21 वे
परब्रह्म स्वामी महाराजांची साधना कशी करावी ?
स्वामी भक्तांनो,
           आनंदनाथ महाराजांच्या अभंगवाणीद्वारे आपण आजगायत 20 पुष्पाद्वारे स्वामींचे स्वरूप दर्शन पाहितले, स्वामी महाराजांच्या सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी अधिकाराचे दर्शन ही आपणाला झाले. स्वामींचे सेवा कशी करावी ? अंधश्रद्धा कशी घालवावी ? याची ही माहिती आपण घेतली. स्वामी महाराज पूर्ण परब्रह्म असून स्वामींची सेवा केल्यास ईतर काहीही करायची आवश्यकता नाही. याचे ही ज्ञान आपण मिळवले. कर्मकांडाच्या अतिरेकापेक्षा शुद्ध भक्तिभाव स्वामींना अधिक प्रिय आहे, याचीही इत्यंभूत माहिती आपण घेतली. स्वामींच्या कृपाशीर्वादाने अद्वेत तत्वाला ही आपण स्पर्श केला आहे. ही सर्व माहिती जाणून घेतल्यामुळे जवळपास आपल्याला मनातील स्वामी महाराजांच्या विषयी असलेले सर्व गैरसमज दूर होऊन, स्वामींच्या सत्य आणि शुद्ध स्वरूपाचे ज्ञान आपल्याला निश्चितच झाले आहे.

परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरुप वर्णन॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 20 वे
परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरुप वर्णन
स्वामी भक्तांनो,
            स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या आत्मानुभवातून प्रकट झालेले स्वामींचे दिव्य काव्यामृत आपण मागील 19 पुष्पापासून पाहात आहोत. हे आपले 20 वे पुष्प आहे. आपण ही आनंदनाथ महाराजांच्या अभंगाची लेखमाला 21 पुष्पानंतर तुर्तास थांबविणार आहोत. ती पुन्हा काही दिवसांनी सुरु करु...! काही दिवसांची विश्रांती घेऊन आपण पुन्हा स्वामीसुत महाराजांचे अभंग चर्चेसाठी घेणार आहोत. स्वामीसुत महाराजांचे 21 अभंग पाहून पुन्हा दिगंबर दास महाराजांचे 21 अभंग पाहणार आहोत. असे पुढील नियोजन आहे.
            त्यामुळे हे आपले आनंदनाथ महाराजांच्या अभंगाचे शेवटून दूसरे पुष्प आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.......!

दीनजन उद्धारक परब्रह्म स्वामी महाराज॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 19 वे
 दीनजन उद्धारक परब्रह्म स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे सर्वाधिपती स्वामी महाराज हे अल्पशा सेवेने ही संतुष्ट होतात, त्यांना फक्त भाव महत्वाचा आहे. जसे  भगवान श्री कृष्णाने सुदामाला न मागता ही सर्व काही दिले, तसेच स्वामी महाराज आपल्या भक्तांना न मागता ही सर्वस्व देऊन टाकतात. तेव्हा अशा प्रेमळ व सर्वसत्याधिश स्वामी महाराजांच्या दरबारी याचक म्हणून उभे राहण्यापेक्षा त्यांच्याशी एकरुप होऊन राहावे, असे आनंदनाथ महाराज आजच्या अभंगातून सांगणार आहेत. स्वतः आनंदनाथ महाराज हे स्वामी स्वरुपात एकरुप झाल्यामुळे ते स्वामी महाराजांशी कधी मित्रत्वाने, कधी शिष्यत्वाने तर कधी पुत्र या नात्याने व्यवहार करत असत. कारण स्वामी महाराज व आनंदनाथ महाराज यांच्यात द्वेताद्वेत भेद ऊरलाच नव्हता, ते एकरुप आणि एकतत्व झाले होते.

मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 18 वे
मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो,
            परमार्थ करत असताना सर्वात मोठा अडसर ठरतो तो आपला प्रपंच आणि आपली त्याप्रती असणारी ओढ ! मनुष्य आपल्या संसारात एवढा एकरूप झालेला असतो की, त्याला संसारापेक्षा ही चिरंतन सुख काही आहे, याची कल्पना ही नसते किंवा कल्पना असली तरी प्रपंचाचा मोह सुटत नाही. एवढे आकर्षण व हव्यास या नश्वर प्रपंचाचा मनुष्याला आहे. काही जण तर या नश्वर प्रपंचात, मायामोहात एवढे गुरफटतात की, आपल्या कुटुंबाशिवाय दूसरे काही विश्वच नाही, अशी यांची धारणा आहे.

।। अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ।।॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 17 वे
।। अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ।।
स्वामी भक्तांनो,
             आजचा आपला अभंग हा गुरुभक्तीचे महत्व समजाऊन सांगणारा आहे. भूतलावर जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला गुरु हा करावाच लागतो, त्या शिवाय गत्यन्तर नाही ! असे आपल्या धर्मात स्पष्ट केलेले आहे. सद्गुरुचे महत्व सांगताना एके ठिकाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, 'सद्गुरु वाचोनी सापडेना सोय । धरावे पाय आधी आधी ।।'  किंवा यापुढे जाऊन सद्गुरु आपल्या जीवनात नेमके काय परिवर्तन करतात हे सांगताना तुकाराम म्हणतात, 'आपणा सारीखे करिते तात्काळ । नाही काळ वेळ तयालागी ।।'  अशा प्रकारे तुकोबांनी सद्गुरु माहात्म्य वर्णन केले आहे.
           सद्गुरु आपला मार्गदर्शक असतो, आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा उर्जास्रोत असतो! तेव्हा तो योग्य मार्ग दाखवणारा आणि आत्मज्ञानी असला पाहिजे, तरच आपले कल्याण करेल ! जर आपला गुरु आपल्याला चूकीच्या दिशेने घेऊन जात असेल तर आपण वेळीच सावध होऊन अशा पाखंडी व्यक्ति पासून आपली सुटका करुण घ्यावी आणि योग्य सद्गुरु जवळ करावा, हेच आपल्याला कल्याणकारक असते.

।। ब्रह्माण्डनायक स्वामी महाराज ।।॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 16 वे
।। ब्रह्माण्डनायक स्वामी महाराज ।।
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म स्वामी महाराज हे ब्रह्माण्डनायक आहेत. ब्रह्माण्डातील सर्व गोष्टीवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. स्वामींच्या पुढे सर्व जण शरणांगत आहेत. जो स्वामींना शरण गेला, त्याला अन्य काही करायची गरज नाही. आणि जो स्वामी महाराज सोडून इतरत्र फिरतो त्याला शेवटी स्वामींच्या चरणी आल्याशिवाय गत्यन्तर नाही. असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे. तेव्हा सर्वत्र फिरून किंवा वळसा घालून स्वामींच्या पायी येण्यापेक्षा पहिल्यांदाच स्वामी चरण धरणे इष्ट आहे. हिच शिकवण देणारा आपला आजचा अभंग आहे. आजच्या अभंगातून स्वामींचे ब्रह्माण्डनायकत्व आनंदनाथ महाराज आपल्या मनावर ठसवणार आहेत. तेव्हा आपण आता अभंग पाहू या....!

।। श्री वटवृक्ष स्वामी महाराज ।।॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 15 वे
।। श्री वटवृक्ष स्वामी महाराज ।।
(अक्कलकोट येथील वटवृक्षाचे माहात्म्य वर्णन ! )
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज किंवा वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज या नावाने सर्व प्रसिद्ध आहेत. अनंत ब्रह्माण्डाचा मालक जेव्हा प्रथमच भूलोकी सगुण रुपात ज्या क्षेत्री स्थिरावला ते भूवैकुंठ म्हणजे अक्कलकोट होय ! म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे त्यांचे सर्व परीचित नाव आहे. तसेच हा ब्रह्माण्डनायक आपल्या पूर्ण वास्तव्यात अक्कलकोटी एका वटवृक्षाखाली स्थिरावला म्हणून दूसरे नाव वटवृक्ष स्वामी ! बऱ्याच वेळा अनेक भाविकांना वाटते की, स्वामी महाराज हे दत्तावतारी आहेत म्हणून औदुम्बर हाच स्वामींचा आवडता वृक्ष आहे, पण तसे नाही. स्वामी महाराजांनी निवडलेला वृक्ष हा वटवृक्ष आहे, औदुम्बर नाही. खरे पाहता स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे सर्वच देवी देवतासुद्धा स्वामींच्या शक्तिचा अंश आहेत. तसेच स्वामी महाराज हे ब्रह्माण्डनायक आणि सृष्टि रचियते असल्यामुळे त्यांना ब्रह्माण्डातील सर्वच्या सर्वच गोष्टि प्रिय आहेत. सर्वांचा निर्माता असणाऱ्या स्वामी देवांना एक गोष्ट प्रिय आणि दूसरी अप्रिय असे काहीही नाही.

भक्तवत्सल परब्रह्म स्वामी महाराज !॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पु‍ष्प 14 वे
भक्तवत्सल परब्रह्म स्वामी महाराज !
स्वामी भक्तांनो,
         परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांच्या सोबत कायम सावली सारखी वावरणारी गुरुमूर्ती म्हणजे आपले स्वामी महाराज होत. सर्व नाती-गोती, आप्तेष्ट जरी कठिण प्रसंगी सोडून गेले, तरी सुद्धा स्वामी महाराज कायम आपल्या सोबत असतात. एवढेच काय सर्व देवी देवता जरी रागावल्या तरी सुद्धा स्वामी महाराज आपली साथ सोडत नाहीत. पण एकदा का स्वामींनी साथ सोडली तर मग 33 कोटी देवता ही तुमचे संरक्षण करू शकत नाहीत. असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे. त्यामुळे स्वामी महाराज सदैव आपल्या सोबत राहतील असेच कर्म करावे. स्वामी आज्ञेचे पालन करावे. इतरांच्या मागे आंधळेपणाने न धावता, स्वामींनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करावी. स्वामी महाराजांना आपलेसे करावे. यातच आपले हित आहे.

शुध्द आणि समर्पित भावाची स्वामी भक्ती !॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पु‍ष्प 13 वे
शुध्द आणि समर्पित भावाची स्वामी भक्ती !
स्वामी भक्तांनो,
          मागील तीन दिवस आपण आनंदनाथांचे अंधश्रध्दा निर्मूलन पाहितले. स्वामी महाराजांची सेवा करत असताना किती सजग आणि चाणाक्ष असायला हवे, याची जाणीव आपल्याला यातून झाली. अंधश्रध्देचा प्रंचड तिटकारा परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना होता. याचे अनेक दाखले स्वत: स्वामींनीच आपल्या वास्तव्यात अक्कलकोटी दिलेले आहेत. हिच परंपरा स्वामींच्या सर्व अंतरंगीच्या शिष्यांनी पुढे चालू ठेवती. यात श्री बाळाप्पा महाराज असोत किंवा आनंदनाथ महाराज असोत. या सर्व शिष्यांनी स्वामींच्या समाधी नाट्यानंतर सुध्दा स्वामींच्याच मुळ चौकटीप्रमाणे कार्य केले. आपल्याकडे येणारा भोळा भाबडा जीव हा स्वामींनीच पाठवलेला आहे असे समजून या माहात्म्यांनी आलेल्या दु:खित जीवाला आधार देवून स्वामींची मुळ सेवा करायला सांगितली. भाविकांच्या मनातील वैचारीक गोंधळ नाहिसा केला.

आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 03॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 12 वे
आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 03
स्वामी भक्तांनो,
        ढोंगी बुवा-बाबा, पाखंडी धर्मगुरु यांचे सत्य स्वरूप जगासमोर मांडल्यानंतर आता आनंदनाथांनी आपला मोर्चा वाचाळ आणि कर्मठ धर्म पंडितांकडे वळवला आहे. कर्मकांडाचा भयानक आणि अनावश्यक स्तोम माजवणाऱ्या या लोकांना आनंदनाथ सत्य धर्म व शास्त्रशुध्द ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगत आहेत. तत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी एखादी बाब पुढे अलिखित नियम बनून लोकांच्या मनात रुतून बसते. याच रुढी परंपरा नंतर धर्म नियम म्हणून आंधळेपणाने आणि सक्तीने पाळल्या जातात. मुळ ईश्वर सेवा आणि ईश्वर प्राप्ती या गोष्टींना दुय्यम स्थान देऊन हे अनावश्यक नियम आणि कर्मकांड पुढे येते. यातूनच मग उच्च - नीच, दलित सवर्ण, श्रेष्ठ कनिष्ठ, असे निरर्थक आणि अन्यायकारक भेद निर्माण होतात.

आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 02 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 12 वे
आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 02
स्वामी भक्तांनो,
         आनंदनाथ महाराज हे स्वामींचे अंतरंगीचे शिष्य होते हे जेवढे सत्य आहे, तेवढेच ते डोळस श्रध्दा ठेवणारे होते हे ही निर्विवाद सत्य आहे. अंधश्रद्धा ही मुळात स्वामी महाराजांना सुद्धा अमान्य होती. म्हणून अनेक वेळा स्वामींनी अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले आहे. आपल्या डोळ्याला दिसते ते आणि बुद्धिला पटते तेच मनुष्याने करावे, असा स्वामींचा दंडक असे. मुक्या प्राण्यावर स्वामींचा खुप जीव असे. त्यांना त्रास देणाऱ्या लोकांना स्वामी खुप रागावत. त्यामुळे स्वामींचा कोणताही भक्त त्याकाळी पशु हत्या किंवा पशु बळी अशा पातकांपासून दुरच असे. कारण स्वामींची तशी तंबीच असे.

आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 01 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 12 वे
आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 01
करिती कीर्तन सांगती पुराण । परि आत्मज्ञान नाही नाही

स्वामी भक्तांनो,
         काल स्वामींच्या नावे बाजार मांडून भक्तांना लुटणाऱ्या, ढोंगी लोकांना प्रेमाचा हितोपदेश देणाऱ्या, आनंदनाथ महाराजांनी आजच्या आपल्या अभंगातून, या ढोंगी लोकांना कसे ओळखायचे ? यांची लक्षणे कोणती ? याची माहिती दिलेली आहे.
         हे ढोंगी लोक खुप चाणाक्ष आणि चतुर असतात. यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असतात. बाहेरुन जरी हे लोक प्रेमळ, निरागस, निर्लोभी, कनवाळू आहेत, असे भासवत असले तरी यांचे मुळ स्वरूप हे कपटी, पाताळयंत्री, लोभाचे भस्मासुर, वासनांध, पाषाणहृदयी असते. हे पाखंडी लोक आपल्या बाह्य स्वरुपाने दुःखित, पिडीत, गरजू लोकांना आपल्या जाळ्यात अलगद ओढतात व एकदा का तो पूर्णपणे अकिंत झाला की, मग यांचे मुळ स्वरुपातील कपटी डावपेच सुरु होतात. यांचे हे राक्षसी रूप चाणाक्ष लोकांच्या लगेच ध्यानात येते. पण सुरुवातीला श्रद्धेपोटी, अंधविश्वासामुळे याकडे दुर्लक्ष केल्या जाते.

नामाची तिजोरी । प्रेमाची रोकड॥


 श्री स्वामी समर्थ 

श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 11 वे
नामाची तिजोरी । प्रेमाची रोकड
         स्वामी महाराजांच्या सेवेत आपले पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या आनंदनाथ महाराजांनी स्वामी सेवेचा प्रचार प्रसार हेच आपले अंतिम ध्येय ठेवले होते. स्वामी नामाशिवाय कुठलीही गोष्ट त्यांना नको होती. पैसा, प्रसिद्धि, मोह, लालसा, प्रतिष्ठा या सर्व बाबी ते तुच्छ मानत. एकदा का साधक प्रसिद्धिच्या मागे लागला की, त्याची आध्यात्मिक प्रगती खूंटते. तसेच साधना मार्गात पद, पैसा, लालसा या बाबीला महत्व प्राप्त झाले की मग आध्यात्मिक प्रगती, ईश्वर प्राप्ती, सेवाभाव या गोष्टी मागे पडून तेथे व्यवहार सुरु होतो. पुढे याच व्यवहाराचे रुपांतर मोठ्या व्यवसायात होऊन किराणा मालाच्या दूकाणाप्रमाने आध्यात्मिक वस्तुंची आणि ईश्वर भक्तिची विक्री सुरु होतो. तेव्हा मग अशा ठिकाणी ना ईश्वराचे अस्तित्व असते, ना जिज्ञासु भक्तांचे, असते ती फक्त बाजारू गर्दी ! अन तेथे भरतो तो केवळ श्रद्धेचा बाजार ! बाकी काही नाही.

सर्वांन्तयामी सर्वेश्वर स्वामी महाराजांची थोरवी श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 10 वे
सर्वांन्तयामी सर्वेश्वर स्वामी महाराजांची थोरवी
स्वामी भक्तांनो,
             यापूर्वी स्वामी वैभव दर्शन 09 वे पुष्प भाग एक आणि दोन मध्ये झालेल्या थोड्याशा विषयांतरानंतर आपण आपल्या मुळ विषयाकडे वळू या. स्वामींच्या अंतरंगी एकरूप झालेल्या श्री आनंदनाथ महाराजांच्या भावपूर्ण रचनांचा आनंद घेऊ या.
         काही स्वामी भक्तांनी जिज्ञासेपोटी अशी विचारणा केली की, आपण हे अभंग कोणत्या ग्रंथातून घेतलेले आहेत. जशी तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांची अभंग गाथा आहे, तशीच एखादी आनंदनाथ महाराजांची अभंग गाथा आहे का ? असेल तर हा ग्रंथ आम्हाला वाचायला कुठे भेटेल. इत्यादि. या सर्व जिज्ञासु स्वामी भक्तांना सांगणे आहे की, श्री आनंदनाथ महाराजांची श्री स्वामी समर्थ स्तवन गाथा या नावाने एक अभंग गाथा मागील काही वर्षापूर्वी पुनर्वसु प्रकाशनाने प्रकाशित केलेली होती. ज्यात आनंदनाथ महाराजांच्या उपलब्ध असलेल्या जवळपास 2300 अभंग रचना यात समाविष्ट केलेल्या होत्या. स्वामी भक्तांच्या उदंड प्रतिसादाने ही आवृत्ती अल्पावधितच संपली. नंतर यात संशोधन करुण नवीन आवृत्ती प्रकाशित करण्याचे काम अंतिम टप्यात आहे, ही नवीन आवृत्ती पुढील वर्षभरात आपल्या सर्वासाठी उपलब्ध होईल, असे पुनर्वसु प्रकाशनच्या श्री विवेक वैद्य सरांनी सांगितले आहे. जर आपल्यापैकी कोणाकडे तो पूर्वीचा ग्रंथ असेल, किंवा आपल्या पाहण्यात कुठे आला असेल तर मला अवश्य कळवा. पुढील स्वामी वैभव दर्शनासाठी तो खुप उपयोगी पडणार आहे. 

परब्रह्म भगवान श्री स्वामींची पूजा व भक्ति कशी करावी ? श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 09 वे
(भाग दूसरा)
परब्रह्म भगवान श्री स्वामींची पूजा व भक्ति कशी करावी ?
 या पूर्वीच्या पहिल्या भागात आपण स्वामींची सेवा कोणती करावी ? याची माहिती घेतली. तर आता या दुसऱ्या भागात आपण स्वामींची पूजा भक्ति कशी करावी याची माहिती घेणार आहोत.
स्वामी भक्तांनो,

॥ परब्रह्म भगवान श्री स्वामींची सेवा व भक्ति कशी करावी ॥ श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 09 वे
परब्रह्म भगवान श्री स्वामींची सेवा व भक्ति कशी करावी
(भाग पहिला)
 या पहिल्या भागात आपण स्वामींची सेवा कोणती करावी ? याची माहिती घेऊ या. तर भाग दूसरा हा स्वामींची पूजा भक्ति कशी करावी यावर आधारित राहिल.
            स्वामी वैभव दर्शनाला सुरुवात झाल्यापासून अनेक वेळा असंख्य स्वामी भक्तांनी एकच प्रश्न केला की, स्वामींची सेवा कशी व कोणती करावी ? यातील अनेकजण पूर्वीपासुन स्वामी सेवा ही करतच होते, नाही असे नाही. मात्र आपली आहे ती सेवा योग्य आहे का नाही किंवा स्वामींची पूर्ण कृपादृष्टी मिळवण्यासाठी अजून कोणती सेवा करावी असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले होते. बहुसंख्य स्वामी भक्त हे नित्यनेमाने स्वामी चरित्र सारामृत वाचतात, त्यातून त्यांचे अनंत प्रश्न सुटले. असंख्य अनुभूती ही त्यांना आल्या. पण या पलिकडे काही त्यांची झेप गेली नाही, याच कारणामुळे अजूनही लोकांना स्वामी महाराज म्हणजे नेमके कोण ? स्वामींचे सामर्थ्य ते कोणते ? स्वामींचा अधिकार तो कोणता ? याची माहिती नाही..! फक्त लोक सांगतात म्हणून स्वामी परब्रह्म आणि ब्रह्माण्डनायक आहेत एवढेच त्यांनी मनात पक्के केले आहे. परंतु या पलिकडे त्यांना परब्रह्म म्हणजे कोण ? ब्रह्माण्डनायक म्हणजे काय ? याचा उलगड़ा अजून झाला नाही !

॥ अशुभ तिथी शुभ होती । स्वामीचरणी राहाता प्रीती ॥ श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 08 वे
अशुभ तिथी शुभ होती  स्वामीचरणी राहाता प्रीती 
स्वामी भक्तांनो,
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडनायक आहेत. त्यामुळे ब्रह्मांडातील सर्व दृश्य अदृश्य गोष्टीवर त्यांचे प्रभूत्व आहे. संपूर्ण ब्रह्मांडातील एक ही गोष्ट त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर नाही. सर्व देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर हे स्वामीं आज्ञेचे त्वरेने पालन करतात. प्रत्यक्ष काळ हा सुध्दा स्वामींच्या चरणाचा दास आहे. तो पडेल ती स्वामी आज्ञा पाळण्यास सत्वर तयार असतो. हे आपण स्वामी वैभव दर्शन 02 मध्ये पाहितलेले आहे. असे असताना सुध्दा काही जण विनाकारण ही वेळ शुभ, ही अशुभ, हा दिवस चांगला, हा वाईट, या दिवशी हे कार्य करा, त्या दिवशी हे करू नका. असे काही गोड गैरसमज पाळताना दिसतात. हे पुर्वापार चालत आलेल्या परंपरेमुळे असो किंवा आपले अज्ञान असो. कारण काहीही असो. मात्र या चांगल्या वाईट काळाचा, शुभ अशुभ वेळेचा खुप मोठा पघडा आपल्या मनावर आहे, हे मात्र नक्की.

॥ सर्वभयनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज ॥

sarv bhay nashak sarveshwar swami maharaj


 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 07 वे
सर्वभयनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज 
स्वामी भक्तांनो……..
आपण मागिल काही दिवसापासून स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या भावपुर्ण रचनेतून स्वामींचे परब्रह्मत्व व सर्वश्रेष्ठत्व जाणून घेत आहोत. आनंदनाथ महाराजांच्या स्वानुभवातून प्रकट झालेले स्वामी स्वरूप हे आपल्या आजपर्यंतच्या अनेक समजूतींना तडा देणारे तर आहेच, पण यासोबतच ब्रह्मांडनायक स्वामींचा अधिकार उलगडून दाखवणारे ही आहे. यामुळे स्वामी महाराज हे नेमके कोण ? याची स्पष्ट जाणीव आपल्याला होत आहे. स्वामी विषयी निर्माण झालेले बरेच गैरसमज दूर होत आहेत. काही गैरसमज अजून दूर व्हायचे आहेत. ते यथावकाश स्वामी महाराज निश्चितच दूर करतील. खरं तर स्वामी महाराजांच्या विषयी जनमाणसात पसरलेले गैरसमज दूर होऊन स्वामींची सत्य आणि शाश्वत सेवा आपल्याकडून घडावी या उद्देशासाठीच आपण ‘स्वामी वैभव दर्शन’ ही लेखमाला सूरू केलेली आहे. या लेखमालेतल्या पहिल्या चालू भागात आपण स्वामी सखा आनंदनाथ महाराज यांचे अनुभव कथन त्यांच्या रचनेतून पाहात आहोत. यांनतर मग आपण इतर स्वामी भक्तांचे अभंग पाहणार आहोत. असो.

भक्तकाज कल्पद्रुम परब्रह्म स्वामी महाराज

bhaktkaj kalpdrum swami maharaj


 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 06 वे
भक्तकाज कल्पद्रुम परब्रह्म स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो, सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैत या सर्वांच्या पलिकडे असणारे आपले स्वामी महाराज आहेत. ते सर्वांव्याप्त असूनही  सदैव नामनिराळेच राहतात. त्यांना जन्म मृत्यू, जरारोग्य हे कधीही बाधू शकत नाही. 1878 मध्ये जरी त्यांनी समाधी घेण्याचे नाट्य रचले असले, तरी त्यानंतर केवळ तिसऱ्याच दिवशी स्वामी महाराज हे अक्कलकोट जवळच्या निलेगावी आपल्या सर्वं भक्तजनांसह प्रकट झाले होते. निलेगावच्या पाटलाला आम्ही शनिवारी तुझ्या घरी येऊ, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र  त्याआधीच्याच मंगळवारी सांयकाळी त्यांनी समाधी  नाट्य रचले. त्याकाळी तातडीने संदेश पोहोचविण्याची काहीच यंत्रणा नसल्यामुळे याबाबत निलेगावात काहीही महित नव्हते. परंतु आपल्या भक्ताला दिलेल्या वचनाप्रमाणे स्वामी महाराज हे समाधीनंतर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस निलेगावी प्रकट झाले. शुक्रवारी तर ते आपल्या बाळाप्पा, भुंजगा, श्रीपाद भट, ज्योतिबा पाडे अशा सर्व जेष्ठ सेवेकऱ्यांसह ईतर 50-60 भक्तांचा लवाजामा घेऊन उपस्थित होते. यावरून आपल्याला स्वामींच्या सामर्थ्याची महती कळते.