श्री स्वामी समर्थ जयंती

                     II श्री स्वामी समर्थ II          राजांचे राजे ! योग्यांचे योगी ! भक्त वत्सल, भक्ताभिमानी ! भक्तीचे भूकेले आणि ढोग्यांचे कर्दनकाळ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या 'प्रकट दिनानिमित्त' म्हणजेच 'स्वामी जयंती' निमित्त त्रिवार वंदन...!


       आजच्या या 'स्वामी प्रकट दिनाच्या' मंगलदिनी दत्तावधूत श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अक्कलकोट स्वामींनी सदैव आपली कृपादृष्टि आम्हा पामरावर राहु द्यावी, आमच्या कडून दीन-दुःखितांची सेवा करून घ्यावी व कुठल्याही व्यक्ति माहात्म्यापेक्षा स्वामींची असणारी सर्वोच्च शक्ति यावर आमची श्रद्धा व एकनिष्ठता  राहू द्यावी....!
        हिच दीनजन उद्धारक, पतित पालक, करुणानिधान, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी स्वामींना विन्रम प्रार्थना...!!!


               II श्री स्वामी चरणार्पणमस्तु II