Thursday, 24 May 2018

श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक।। श्री स्वामी समर्थ ।।
।। श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ।।
।। श्री स्वामी चरित्र पारायण समूह भक्त मंडळ ।।
देवाधिदेव श्री स्वामी देवांच्या कृपाशिर्वादाने आणि स्वामी भक्तांच्या आग्रहास्तव सर्व स्वामी भक्तांना अधिक मासानिमित्त एक अप्रतिम भेट.....!
श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक
         बऱ्याच दिवासाच्या प्रतिक्षेनंतर श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक हे आज अधिक जेष्ठ शुक्ल पक्ष १०, शके १९४० वार- गुरुवार दि.२४/०५/२०१८ रोजी प्रकाशित केले आहे!
          या ई-बुक मध्ये श्री विष्णु बळवंत थोरात लिखित २१ अध्यायी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी, श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर विरचित अत्यंत प्रभावी श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामीचरित्र स्तोत्र, श्री स्वामीपाठ आणि श्री विश्वनाथ वऱ्हांडपांडे विरचित श्री तारक मंत्र याचा समावेश आहे !

Sunday, 20 May 2018

परब्रह्म स्वामी महाराजांची साधना कशी करावी ?॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 21 वे
परब्रह्म स्वामी महाराजांची साधना कशी करावी ?
स्वामी भक्तांनो,
           आनंदनाथ महाराजांच्या अभंगवाणीद्वारे आपण आजगायत 20 पुष्पाद्वारे स्वामींचे स्वरूप दर्शन पाहितले, स्वामी महाराजांच्या सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी अधिकाराचे दर्शन ही आपणाला झाले. स्वामींचे सेवा कशी करावी ? अंधश्रद्धा कशी घालवावी ? याची ही माहिती आपण घेतली. स्वामी महाराज पूर्ण परब्रह्म असून स्वामींची सेवा केल्यास ईतर काहीही करायची आवश्यकता नाही. याचे ही ज्ञान आपण मिळवले. कर्मकांडाच्या अतिरेकापेक्षा शुद्ध भक्तिभाव स्वामींना अधिक प्रिय आहे, याचीही इत्यंभूत माहिती आपण घेतली. स्वामींच्या कृपाशीर्वादाने अद्वेत तत्वाला ही आपण स्पर्श केला आहे. ही सर्व माहिती जाणून घेतल्यामुळे जवळपास आपल्याला मनातील स्वामी महाराजांच्या विषयी असलेले सर्व गैरसमज दूर होऊन, स्वामींच्या सत्य आणि शुद्ध स्वरूपाचे ज्ञान आपल्याला निश्चितच झाले आहे.

परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरुप वर्णन॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 20 वे
परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरुप वर्णन
स्वामी भक्तांनो,
            स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या आत्मानुभवातून प्रकट झालेले स्वामींचे दिव्य काव्यामृत आपण मागील 19 पुष्पापासून पाहात आहोत. हे आपले 20 वे पुष्प आहे. आपण ही आनंदनाथ महाराजांच्या अभंगाची लेखमाला 21 पुष्पानंतर तुर्तास थांबविणार आहोत. ती पुन्हा काही दिवसांनी सुरु करु...! काही दिवसांची विश्रांती घेऊन आपण पुन्हा स्वामीसुत महाराजांचे अभंग चर्चेसाठी घेणार आहोत. स्वामीसुत महाराजांचे 21 अभंग पाहून पुन्हा दिगंबर दास महाराजांचे 21 अभंग पाहणार आहोत. असे पुढील नियोजन आहे.
            त्यामुळे हे आपले आनंदनाथ महाराजांच्या अभंगाचे शेवटून दूसरे पुष्प आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.......!

दीनजन उद्धारक परब्रह्म स्वामी महाराज॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 19 वे
 दीनजन उद्धारक परब्रह्म स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे सर्वाधिपती स्वामी महाराज हे अल्पशा सेवेने ही संतुष्ट होतात, त्यांना फक्त भाव महत्वाचा आहे. जसे  भगवान श्री कृष्णाने सुदामाला न मागता ही सर्व काही दिले, तसेच स्वामी महाराज आपल्या भक्तांना न मागता ही सर्वस्व देऊन टाकतात. तेव्हा अशा प्रेमळ व सर्वसत्याधिश स्वामी महाराजांच्या दरबारी याचक म्हणून उभे राहण्यापेक्षा त्यांच्याशी एकरुप होऊन राहावे, असे आनंदनाथ महाराज आजच्या अभंगातून सांगणार आहेत. स्वतः आनंदनाथ महाराज हे स्वामी स्वरुपात एकरुप झाल्यामुळे ते स्वामी महाराजांशी कधी मित्रत्वाने, कधी शिष्यत्वाने तर कधी पुत्र या नात्याने व्यवहार करत असत. कारण स्वामी महाराज व आनंदनाथ महाराज यांच्यात द्वेताद्वेत भेद ऊरलाच नव्हता, ते एकरुप आणि एकतत्व झाले होते.

मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 18 वे
मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो,
            परमार्थ करत असताना सर्वात मोठा अडसर ठरतो तो आपला प्रपंच आणि आपली त्याप्रती असणारी ओढ ! मनुष्य आपल्या संसारात एवढा एकरूप झालेला असतो की, त्याला संसारापेक्षा ही चिरंतन सुख काही आहे, याची कल्पना ही नसते किंवा कल्पना असली तरी प्रपंचाचा मोह सुटत नाही. एवढे आकर्षण व हव्यास या नश्वर प्रपंचाचा मनुष्याला आहे. काही जण तर या नश्वर प्रपंचात, मायामोहात एवढे गुरफटतात की, आपल्या कुटुंबाशिवाय दूसरे काही विश्वच नाही, अशी यांची धारणा आहे.